Pune Corporation : कुणाल खेमनार साखर आयुक्त ; पृथ्वीराज मीना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने काढले, तर नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. मीना यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Pune Corporation
Pune Corporationsakal

पुणे : महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने काढले, तर नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. मीना यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. पृथ्वीराज बी. पी. हे २०१४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट २०२० रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांनी महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

दरम्यान, शहरातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी पार पाडली. ढाकणे यांच्या प्रयत्नामुळे आदर्श रस्ते, आदर्श शाळा यांसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली.

भिडेंवर मेट्रोची जबाबदारी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतून हटवण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल्वे काँर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आज तेरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

मुंबई महापालिकेतून अश्विनी भिडे यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनाही हटवण्यात आले होते. आता वेलारासू यांच्या जागी अभिजित बांगर यांची नियुक्ती झाली आहे. राजेश नार्वेकर यांची नियुक्ती सहकार व निबंधक सहकारी संस्थेच्या (पुणे) आयुक्तपदी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com