esakal | डॉ.माया पवार शिरुर तालुक्यात सर्वोत्कृष्ठ
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ.माया पवार

डॉ.माया पवार शिरुर तालुक्यात सर्वोत्कृष्ठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : मर्यादित आरोग्य कर्मचारी असतानाही शिरुर तालुक्यातील १४ गावांत उच्चांकी ३६ हजार लोकांना तर टक्केवारीत ६६ टक्के कोवीड प्रतिबंधक लशीकरण करणा-या केंदूर (ता.शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.माया पवार यांचा विशेष सन्मान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष देवेंद्र सासवडे यांनी केला व त्यांच्या कामाची जिल्हा परिषदेसह राज्य सरकारने दखल घेण्याची विनंतीही केली.

कोवीड लशीकरणाच्या अनुषंगाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शिरुर तालुक्यातील सर्व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२ उपकेंद्रे व ३ ग्रामिण रुग्णालयांमध्ये फिरुन चार दिवसांत एकुण कोवीड प्रतिबंधक लशीकरणाच आढावा घेतला. यात तालुक्यात उच्चांकी ६६ टक्के लशीकरणात प्रथम क्रमांक पटकावला तो केंदूरच्या प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.माया पवार यांनी. त्यांनी कार्यक्षेत्रातील एकुण १४ गावांमधील एकुन ५४ हजार लोकसंख्येपैकी ३६ हजार जनतेपर्यंत लशीकरण पोहचवून यशस्वी केले.

हेही वाचा: राज्यसभा पोटनिवडणूक: देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेससमोर अट ठेवली?

याच निमित्ताने संघटनेचे महाराष्ट्र प्रांत महसुल समिती प्रमुख रमेश टाकळकर यांचे हस्ते त्यांना शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व प्रेरणापत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्य देवेंद्र सासवडे, सचिव संतोष शिर्के, पंडीत मासळकर, पर्वतराज नानगे, अशोक मोरे, दत्ता ननवरे आदींसह सर्व आरोग्य कर्मचारी संजय प-हाड, शिल्पा उमाप, कोमल पवार, रोहीणी खंडे आदी उपस्थित होते. दरम्यान केंदूर आरोग्य केंद्र हे आंबेगाव-शिरुर या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील असून त्यांनी केलेले काम प्रशंसनीय असल्याने त्यांना जिल्हा परिषदेनेही सन्मानित करावे असे विनंतीपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी व अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचेकडे पाठविल्याची माहिती सासवडे यांनी दिली.

loading image
go to top