
पुणे : आपलेपणा ओळखणे हे जीवनाचे कर्तव्य आहे. तो ओळखून इतरांशीसुद्धा आपलेपणाने वागणे, हे दुसरे कर्तव्य आहे. सगळ्या जगाच्या मुळाशी एकच तत्त्व असून, ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय. समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे. त्याची आठवण करून देण्याचे कार्य संघ करतो आहे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.