sadanand date
sakal
पुणे - ‘दहशतवाद, नक्षलवाद, फुटीरतावाद, अंतर्गत बंडाळी, संघटित गुन्हेगारी यासारख्या देशांतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानांवर आपण राज्यघटना आणि लोकशाहीमुळे आजवर यशस्वीपणे मात केली. मात्र, आता देशाची प्रगती होताना शत्रू राष्ट्रांकडून पुकारले जाणारे छुपे युद्ध आणि इस्लामिक मूलतत्ववादी दहशतवाद ही नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यावर मात करण्यासाठी लोकाभिमुख व भ्रष्टाचारविरहित प्रशासन तयार करणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे, हेच उत्तर आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांनी शनिवारी केले.