Dr. Narendra Dabholkar : सलग तिसऱ्या दिवशी बचाव पक्षाकडून उलटतपासणी; एस. आर. सिंग यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील खटल्यात बचाव पक्षाकडून सलग तीन दिवस तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी घेण्यात आली.
Dr. Narendra Dabholkar
Dr. Narendra DabholkarSakal

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील खटल्यात बचाव पक्षाकडून सलग तीन दिवस केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी घेण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या कार्यापासून त्यांच्या हत्येच्या घटनेपर्यंतच्या अनेक मुद्यांवर सिंग यांना प्रश्‍न विचारण्यात आले. तपासात समोर आलेले मुद्दे त्यांनी उलटतपासणीत न्यायालयास सांगितले.

सोमवार (ता. २१) पासून सिंग यांची बचाव पक्षाच्यावतीने ॲड. प्रकाश साळशिंगीकर आणि ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात उलटतपासणी घेतली. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सिंग यांची साक्ष नोंदवली होती.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बोगस डॉक्टरांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचा तपास केला का? बंगाली बाबांनी केलेल्या आंदोलनाची माहिती आहे का? डॉ. दाभोलकरांमुळे पाच बंगाली बाबांना अटक झाली होती. रुद्राक्ष माळेतून फायदा होते, असे सांगणाऱ्या बाबांविरोधात डॉ. दाभोलकर यांनी तक्रार दिल्याबाबत काही तपास केला का?, असे प्रश्‍न बचाव पक्षाकडून सिंग यांना करण्यात आले. त्यावर त्यांनी या बाबींचा तपास केला नसल्याची माहिती दिली.

राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याला विरोध केला होता. केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता, याची तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्‍न सिंग यांना विचारण्यात आला. त्यावर सिंग म्हणाले, ‘गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्‍यक तो तपास केला, मात्र या कायद्याला कोणाला विरोध होता, याची चौकशी केली नाही’.

खुनाच्या दोन दिवस आधी डॉ. दाभोलकर यांच्या जात पंचायतबाबत काही बैठका नियोजित होत्या. जात पंचायतच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांचा खून झाला असले, असा तपास करण्यात आला आहे का? अशी विचारणा सिंग यांना करण्यात आली. त्या अनुषंगाने तपास केला नसल्याचे सिंग यांनी सांगितले. खटल्याची पुढील सुनावणी गुरुवारी (ता. २४) होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com