वेब कंपन्यांच्या नफ्यातून हिस्सा घ्यावा : डॉ. नरेंद्र जाधव 

Dr Narendra Jadhav
Dr Narendra Jadhav

पुणे :"भारतामध्ये कोट्यवधी इंटरनेट वापरणारे आहेत, पण त्यातून देशाला काहीच फायदा मिळत नसल्याने 100 टक्के नफा हा परदेशात जात आहे. या वेब कंपन्यांना नॅशनल स्टॉक एक्‍सचेंजमध्ये समभाग नोंदविण्यास भाग पाडून, त्यांच्या नफ्यातून हिस्सा घेतला पाहिजे. असे झाले तर शेअर बाजाराच्या निर्देशांकात 33 टक्‍क्‍यांनी वाढ होईल,'' असे अर्थतज्ज्ञ, संसदीय अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य खासदार डॉ. नरेंद्र जाधव सांगितले. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे मल्टी ऍक्‍ट ट्रेड ऍण्ड इनव्हेस्टमेंट प्रा. लि. चे संचालक उमेश कुडाळकर यांच्या "लस्ट इन इंडिया-टूवड्‌स एफडीआय' या "मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन्स'ची आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आणि भारतातील परकीय गुंतवणुकीच्या धोरणावरील प्रबंधाचे प्रकाशन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, प्रशांत गिरबाने उपस्थित होते. 

"जगभरातील पहिल्या 20 वेब कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही, गुगल, फेसबुक, ऍमेझॉन यांसारख्या कंपन्यांच्या नफ्यातून भारताला काहीच फायदा मिळत नाही. परंतु, चीनने या कंपन्यांवर बंदी घालून स्वकीय कंपन्यांचे हात बळकट केले. त्यामुळे पाच वर्षांत चीनच्या नऊ कंपन्यांनी पहिल्या 20 क्रमांकामध्ये आहेत. ऍपच्या माध्यमातून देशातील नागरिकांची प्रचंड माहिती इतर देशांना मिळत आहे. त्याचा वापर शस्त्राप्रमाणे केला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे. यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही,'' असे जाधव यांनी सांगितले.
 
उमेश कुडाळकर म्हणाले, "स्वातंत्र्यपूर्व काळात इस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून देशातली संपत्ती परदेशात गेली. पण, आता इंटरनेटमुळे पैसा देशाबाहेर जात आहे. ज्या कंपन्या नफ्यातील हिस्सा देतील, त्यांना करामध्ये सूट द्यावी, पण ज्या देणार नाहीत त्यांच्यासाठी कडक नियम करावेत. तरच देशाचा फायदा होईल. मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन कंपन्या भारतात व्यापार करतात. परंतु त्यांचे समभाग विकत घेता येत नाहीत. चीनप्रमाणे भारतानेही धोरण स्वीकारून देशाचा महसूल वाढविला पाहिजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com