कुलगुरू डॉ. करमळकर यांना ‘कोकणभूषण’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पिंपरी - जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘कोकणभूषण’ पुरस्कार यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २२ एप्रिल रोजी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात संध्याकाळी सात वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार नारायण राणे, भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
प्रतिष्ठानतर्फे १९ ते २२ एप्रिलदरम्यान ‘कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शक्‍तीतुरा-बाल्या डान्स आयोजिण्यात आला असून, त्याचे उद्‌घाटन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होईल. 
२१ एप्रिल रोजी संगीत भजनाचा डबलबारी सामना होणार आहे. त्याला खासदार विनायक राऊत उपस्थित राहातील. अखेरच्या दिवशी वधू-वर मेळावा; तसेच ‘पावने इले रे’ ही एकांकिका होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी सांगितले. 

Web Title: dr. nitin karmalkar konkanbhushan award