Dr. Pradeep Kurulkar : डॉ. प्रदिप कुरुलकरचा जामिनासाठी अर्ज

डॉ. कुरुलकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर नऊ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
Dr. Pradeep Kurulkar
Dr. Pradeep Kurulkaresakal

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डॉ. कुरुलकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर नऊ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी व्हाइट लेयर ॲनॅलिसिस चाचणीबाबत आदेश होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या प्रकरणात करुलकरची चौकशी सुरू आहे.

एटीएसने सर्व इलेक्ट्रॉनिक डाटे देखील जप्त केला आहे. डॉ. कुरुलकर तुरुंगातून बाहेर येऊन त्या डिव्हाइसमध्ये फेरफार करू शकत नाहीत, असे डॉ. कुरुलकरचे वकील अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात नमूद आहे. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी गानू यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला.

व्हाइस चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नाही :

डॉ. कुरुलकरची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेयर अँनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात केली आहे. मात्र, एटीएसने मागणी केलेली पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर चाचणी करण्यास डॉ. कुरुलकरने नकार दिला आहे.

त्याबाबत बुधवारी न्यायालयात युक्तिवाद झाला. पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. मात्र व्हाइस लेयर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते. आरोपी तपासास सहकार्य करीत नाही. त्यामुळे न्यायालयाने व्हाइस लेयर चाचणीसाठी परवानगी द्यावी, असा युक्तिवाद ॲड. फरगडे यांनी केला.

इलेक्ट्रॉनिक साहित्य फॉरेन्सिक लॅबला पाठविणार :

गुन्ह्याचा तपास अद्याप बाकी आहे. पॉलिग्राफ आणि व्हाइस चाचणीमुळे आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेले काही इलेक्ट्रॉनिक साहित्य ओपन होत नाहीये. त्यामुळे त्यातील डेटा मिळविण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार आहेत. डॉ. कुरुलकर तपासात बऱ्याच गोष्टी लपत आहे, असे ॲड. फरगडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com