
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: कामातून आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत होतो. आदिवासी लोकांचा विश्वास वाढवला. स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी शेती शिकवली. आपण ज्या देशात राहतो तेथे अशीही लोक राहत आहेत जिथे जीवनावश्यक गोष्टी नाहीत. आज बायफसारखी एखादी संस्था एवढ्या उंचीवर पोहचली आहे, की देशातील १७ राज्यात ही संस्था काम करत असून चांगला नावलौकिक आहे. तरीही अजूनही देशात सामाजिक विषमता आहे. ती वाढत असून काही ठिकाणी चांगली संपन्नता आहे. काही ठिकाणी अजूनही आदिवासी भाग आहे. या भागात अजूनही फार सुविधा आलेल्या नसून देश विकसित होत आहे. परंतु ही विषमता दूर झाली पाहिजे, असे मत डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.