

फॅबच्या किताबाने डॉ. प्रतिभा भोसले सन्मानित
सातारा, ता. १३ : डॉ. प्रतिभा भोसले यांनी राष्ट्रीयस्तरावरील मिस फॅब इंडिया डिजिटल डिवा अवॉर्ड २०२६ हा मानाचा किताब नुकताच मिळवला. त्या साताऱ्यातील उषा प्रकाश भालेराव यांच्या कन्या आहेत.
या स्पर्धेसाठी देशभरातून प्रतिभावान आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात आली होती. यात डॉ. प्रतिभा भोसले यांनी आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर छाप पाडली. लोकमतदानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वाधिक मते मिळवत मिस फॅब डिजिटल डिवा २०२६ अवॉर्ड हा किताब मिळवला. हा किताब आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि लोकप्रियतेचा गौरव करणारा आहे. विविध निकषांवर कामगिरी करत डॉ. प्रतिभा भोसले यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलणाऱ्या डॉ. भोसले या दिल्ली येथील ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्रकाश भालेराव, विघ्नहर्ता ग्रुपचे संजय जाधव, उषातेजचे कार्यकारी संचालक गुलाब काळे यांच्यासह इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
.........
57653 : डॉ. प्रतिभा भोसले
..........
विधी सेवा प्राधिकरणातर्फे
ज्येष्ठांचा सन्मान
सातारा, ता. १३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शिनी वाघमारे, कायदेशीर सल्लागार ॲड. सुचिता पाटील, कृतिशील संघटनेचे प्रा. चंद्रकांत नलवडे, शंकरराव भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. सुचिता पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, महसुली तरतुदी तसेच इतर कायदे व त्यातील तरतुदींची माहिती उपस्थित ज्येष्ठांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.