

Crackdown on Fuel Hoarding: Administration’s Stern Warning in Ambegaon
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्यात पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची गैरसोय करू नका. शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आंबेगावचे प्रभारी तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी शनिवारी (ता.२३) घोडेगाव येथे तहसीलदार कार्यालयात झालेल्या पेट्रोल पंप चालकांच्या आढावा बैठकित दिला.