अबब...एकाच वेळी दहा पेटंटसाठी अर्ज; वैज्ञानिक डॉ. शिरीष खेडीकर यांची कमाल 

shirish-khedikar
shirish-khedikar

पुणे -  येथील भारतीय हवामान खात्यातील वैज्ञानिक डॉ. शिरीष योगराज खेडीकर यांना एकाच वेळी चक्क दहा पेटंटची नोंद केली. दहा यंत्रणांच्या शोधासाठी त्यांनी "पेटंट्‌स, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्‍स, कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' मध्ये याची नोंद केली. 

नाविन्याची आवड असल्यामुळे त्यांनी हे दहा शोध विविध क्षेत्रात लावले आहेत. या पूर्वी त्यांनी पीएच. डी. करताना दोन तर, शास्त्रज्ञ प्रशिक्षण घेताना एक असे, तीन पेटंटचे अर्ज भरले होते. या यशाबद्दल डॉ. शिरीष म्हणाले, ""हवामानशास्त्र विभागात कार्यरत असल्यामुळे माझे बरेच शोध त्यासंबंधी असतात. अनेकदा विविध यंत्र तयार करण्याचे विचार येतात, काही शक्‍य होतात काही नाही. परंतु या दहा शोधांपैकी नऊ यंत्र आकाश, वायु, अग्नी, जल आणि पृथ्वीशी संबंधित आहेत. यांना पंचमहाभूते असे म्हटले जाते. यातील यंत्रणांची चाचणी यशस्वी झाली आहे.'' 

कार्यालयात काम करताना व दैनंदिन जीवनात अनेक अडचणी यायच्या. यासाठी उपाय म्हणून स्वतः या अडचणींना दूर करण्यासाठी यंत्रणांचा शोध लावण्यास सुरवात केली. एकाच दिवशी पाच पेटंट्‌सचे नोंद करण्याचा विक्रम एक व्यक्तीने केला आहे. त्याच्या दुप्पट म्हणजेच दहा पेटंट्‌सची नोंद एकाच दिवशी करून एक नवीन 'रेकॉर्ड' तयार करायचे असे ठरविले होते. 

जर तुमच्या मनात एखादी कल्पना आहे, त्यावर लगेच शोध लावण्यास सुरवात करा. वस्तू तयार करा आणि पेटंटची नोंद करा. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश वेगाने विकास करेल. 
- डॉ शिरीष वाय. खेडीकर, वैज्ञानिक, भारतीय हवामानशास्त्र विभाग 

- खालील पेटंटची नोंद 
* वाऱ्याच्या गुणधर्माची नोंद करण्यासाठी यंत्र 
* सूर्यप्रकाशाच्या प्रखर वेळेला डिजिटल आकड्यात रूपांतरित करण्यासाठी स्कॅनर 
* इनबिल्ट एलईडीसह सोलर ट्रॅकिंग पॅनेल 
* सूक्ष्म हवामान नियंत्रित मच्छरदाणी 
* दुहेरी पाते आणि वॉटर पंपसाठी संयुक्त मोटर असलेले एअर कूलर 
* पाण्याची पातळी शोधण्यासाठीचे स्वयंचलित यंत्र 
* मल्टिफंक्‍शनल ड्युअल स्क्रीन पोर्टेबल इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईस 
* अग्निशामक बाण आणि धनुष्य 
* डास निर्मूलन यंत्र 
* स्वयंचलित उघडणारे आणि बंद होणारे रस्ता दुभाजक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com