इच्छाशक्तीअभावी अभिजात दर्जा नाही - डॉ. श्रीपाद जोशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पुणे - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही. कारण सर्वच राजकीय पक्षांची याबद्दलची इच्छाशक्ती क्षीण आहे. आपलाही त्यांच्यावर दबाव नाही, अशी टीका अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली. 

पुण्यात त्यांच्या मुलाखतीचे आयोजन साहित्य सेतू संस्थेने केले होते. क्षितिज पोटुकले आणि राजन लाखे यांनी ही मुलाखत घेतली. विविध मुद्द्यांवर डॉ. जोशी यांनी परखड मते व्यक्त केली.

साहित्य संमेलनाची निवडणूक रद्द केल्याबद्दल ते म्हणाले, ‘‘आधीची पद्धत कुठे पारदर्शी होती? त्या प्रक्रियेत कोऱ्या मतपत्रिका गोळा केल्या जात होत्या. त्यामुळे निवडीची पद्धत बदलली म्हणजे लोकशाही पायदळी तुडवली, असे म्हणणे दांभिकपणा आहे.’’

भारताबाहेर विश्व साहित्य संमेलन होत नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘भारताबाहेर संमेलन घेणे ही महामंडळाची जबाबदारी नाही, त्यासाठी कुणी निमंत्रण दिले, तर त्यास महामंडळ प्रोत्साहन देत असते.’’ ‘डॉ. जोशी म्हणाले, ‘‘तरुणांचा साहित्याशी संबंध नाही, हा भ्रम दूर करा. साहित्याची पारंपरिक कल्पनाच बदलली आहे, याचे भान आपल्याला नाही. साहित्याची व्याख्या बदलत आहे. तरुणाई नवे साहित्य प्रकार आणू पाहात आहे. तरुण साहित्य वाचत नाही, ही आपल्याला चिंता असेल, तर मराठीचे सेवक आपण तयार केले आहेत का, असा प्रश्न साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी स्वत:ला विचारावा.’’

सर्वच पक्षांची भूमिका जाणून घेणार
राजकीय पक्ष साहित्य संस्कृतीपासून दूरच आहेत. भाषा, साहित्य आणि संस्कृती यावर पक्षांची अधिकृत भूमिका काय, हे त्यांनी जाहीर करावे म्हणून विविध पक्षांच्या प्रवक्‍त्यांना एकत्र बोलावणार आहे. कारण कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकांवर हे मुद्देच येत नाहीत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

Web Title: dr shripad joshi talking