जायकाच्या फेरनिविदा काढण्याचा मसुदा तयार : आयुक्त विक्रम कुमार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

जायका प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यास अंतिम मान्यता घेण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

पुणे : जायका प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यास अंतिम मान्यता घेण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर लगेच निविदा काढण्यात येतील, असे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा दावाही आयुक्तांनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि जायकाच्या अनुदानातून महापालिकेने 990 कोटी रूपयांचा मुठा नदी सुधार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत 11 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, सांडपाणी वाहिन्यांचे जाळे शहरात उभारण्यात येणार आहे.

त्यासाठी एक वर्षांपूर्वी महापालिकेकडून निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु त्या जादा दराने आल्याची ओरड करीत त्या रद्द करण्यास परवानगी द्यावी. तसेच "एक शहर-एक प्रवर्तक' पद्धतीने निविदा काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेने जायकाकडे केली होती. त्यास जायकाने एनओसी दिली. अद्याप त्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आज आयुक्त विक्रम कुमार यांना विचारले असताना त्यांनी हा दावा केला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Draft of Jaika's re-tender prepared says commissioner vikram kumar