नालेसफाई केवळ कागदावरच ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

पुणे - पावसाळ्याला पंधरा दिवस राहिले असतानाही नालेसफाईच्या कामांचे केवळ नियोजन करण्यात येत असून, नेमकी कुठे आणि काय कामे करावयाची आहेत, याची चाचपणी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळ्यांवर सुरू आहे. त्यामुळे ही कामे ऐन पावसाळ्यात सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागात नालेसफाईची गरज असतानाही त्याचे कोणतेही नियोजन महापालिकेने केलेले नाही; तर पावसाळ्यात नाले तुंबल्याने हमखास पाणी शिरण्याच्या घटना घडूनही उपनगरांमधील नाल्यांची आता पाहणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. 

पावसाळ्यापूर्वी एक महिनाआधी ओढे-नालेसफाई आणि दुरुस्तीची कामे केली जातात. त्यासाठी यंदा सुमारे 98 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी म्हणजे, मे महिन्यात ही कामे हाती घेतली जातील, असा अंदाज होता. मात्र, निधी उपलब्ध होऊनही, नियोजन नसल्याने या कामांना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ओढे-नाल्यांलगतच्या रहिवाशांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. 

ओढे, नाले आणि विशेषतः पावसाळी गटारांची कामे वेळेत होत नसल्याने उपनगरांमधील लोकवस्तीत पाणी शिरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पावसामुळे मुख्यतः कळस, धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगरसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील शेकडो घरांमध्ये पाणी साचल्याने रहिवाशांचे हाल झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पावसाळी गटारांची कामे प्राधान्याने करण्याची सूचना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित खात्याला केली होती. तरीही पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेचे सहायक आयुक्त विजय दहिभाते म्हणाले, ""नगर रस्ता परिसरातील पावसाळी गटारे आणि नाल्यांची पाहणी झाली. त्यानुसार आवश्‍यक ती कामे करण्यात येतील. प्रभागनिहाय नियोजन करण्यात येत आहे.'' 

Web Title: Drain cleaning only on paper