बालमित्रांनो, 'करा नाटक आणि मिळवा बक्षिस'!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

फेस्टिव्हलविषयी...

  • एनआयई उपक्रमात सहभागी शाळांना - प्रत्येकी १०० रुपये 
  • सभासदेतर शाळांसाठी - प्रत्येकी २०० रुपये
  • सहभागासाठी अंतिम तारीख - २२ जानेवारी २०२०
  • अधिक माहितीसाठी संपर्क - ९९२२९१३४७३, ८३७८९९३४४६ 

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत आंतरशालेय ‘सकाळ एनआयई नाट्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. २८ ते ३० जानेवारी या कालावधीत पिंपरी येथील एच. ए. विद्यालयात सकाळी १० ते ६ या वेळेत ही स्पर्धा होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यार्थ्यांच्या अभिनय व संवादकौशल्याला वाव मिळावा, या हेतूने या स्पर्धेचे सात वर्षांपासून आयोजन केले जात आहे. 

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील शाळांतील पाचवी ते दहावीतील पंधरा वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थीच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी एकच गट असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत नाटिका सादर करता येईल.

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

भाषानिहाय तीन क्रमांक आणि एकेक उत्तेजनार्थ तसेच वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्यासाठी स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन  विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. 

स्पर्धेसाठी निसर्ग संकट, सोशल मीडिया, बदलती शिक्षणपद्धती हे विषय बंधनकारक आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले जाईल. 

स्पर्धा संयोजनाचे सर्वाधिकार ‘सकाळ एनआयई’कडे असणार आहेत. स्पर्धेसाठी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स स्कूल प्राथमिक व माध्यमिक विभागाचे विशेष सहकार्य लाभले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drama competition for school student by sakal media group