कमी दराच्या निविदांची कामे तशीच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - सांडपाणी वाहिन्यांमधील (ड्रेनेजलाइन) गाळ काढण्यासाठी राबविलेल्या निविदेत ‘गाळ’ अडकल्याचे नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदारांच्या साखळीतून स्पष्ट झाले आहे. या कामाच्या बहुतांशी निविदा २५ ते ३० टक्के कमी दराने आल्या असून, त्या मंजूर केल्याचे दाखले महापालिकेतील पदाधिकारी-नगरसेवकांनीच दिले. जेव्हा एखाद्या कामाची निविदा इतक्‍या कमी दराने मंजूर केली जाते, तेव्हा ती कामेच होत नाहीत, हेही नगरसेवकांनी उदाहरणांसह पटवून दिले. परिणामी, गाळ काढण्याच्या खर्चाने नगरसेवक, अधिकारी आणि ठेकेदारांचे खिसे फुगले आहेत. यानिमित्ताने नगरसेवकांनी ‘तो मी नव्हेच’ हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. 

या प्रक्रियेत आणखी एक बाब उघड झाली ती म्हणजे वर्षभरातच एका प्रभागांत तीन ते साडेतीन कोटी रुपये सांडपाणी वाहिन्या साफ करण्याकरिता खर्च झाल्याची कबुली हडपसरमधील एका नगरसेवकाने दिली. जेव्हा, कामे करायची नसतील तेव्हा अत्यंत कमी दराने निविदा भरण्याचे सूत्रही सर्रास अवलंबिल्याचे उघड झाले आहे.

क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत झालेली कामे, त्यांचा दर्जा आणि निविदा प्रक्रियांची तपासणी करण्यात येईल. वाहिन्यांची कामे करण्याबाबत अर्थसंकल्पात स्वतंत्र योजना मांडण्यात येईल. त्या माध्यमातून कामे करण्यात येतील.
- सौरभ राव, आयुक्त, महापालिका 

Web Title: Dranage Cleaning Issue Contractor Tender Municipal Work