रस्ते गेले खड्ड्यांत अन्‌ खोदकामात...

शिवशंभो लेन, रहाटणी - गेल्या दोन महिन्यांपासून सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
शिवशंभो लेन, रहाटणी - गेल्या दोन महिन्यांपासून सांडपाणी वाहिनीचे काम रखडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच कुठे सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत, असाच प्रश्‍न पडतो. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरात कोठेही खोदकाम न करण्याचा आदेश शहर अभियंता राजन पाटील यांनी पावसाळ्याच्या सुरवातीसच दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणास्तव रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहेत.

     वाल्हेकरवाडी परिसरातील साईराम कॉलनी परिसरात सांडपाणी वाहिनीचे काम संथगतीने सुरू
     मुंबई-पुणे महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील पेट्रोलपंपानजीक खोदकाम सुरू 
     मोरवाडी चौकाकडून न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गावरही खोदकाम
     महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोरच रस्त्याची दुरवस्था
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून खराळवाडीकडे जाणारा मार्ग, खराळवाडी टपाल कार्यालय, कलासागर हॉटेल ते नाशिक फाटा चौक परिसरात खड्डेच खड्डे
     वल्लभनगरहून मिलिटरी डेअरी फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे
     निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसर, रावेत पुनावळे परिसरात खड्डे
     पिंपरीतील म्हाडा वसाहतीलगतच्या रस्त्यावर बारीक खडी
     पिंपरीहून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या पुलावरील रस्त्याची चाळणी
     पिंपळे सौदागरमध्ये सांडपाणी वाहिनी रस्त्यात अथवा रस्त्याच्या कडेलाच पडून
     पूर्वा रेसिडन्सीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत संथगतीने सुरू
     दि क्रेस्ट, प्लोरा या सोसायट्या तसेच चॅलेंजर पब्लिक स्कूल परिसरात सांडपाणी वाहिन्यांचे काम सुरू असताना बॅरिकडेस नाहीत
     रहाटणी गावातील भालेराव कॉर्नरजवळ रस्त्यावरच सांडपाणी वाहिनी पाइप
     विमल गार्डन, थोपटे लॉन्स या कार्यालयांच्या समोरच पावसाचे पाणी
     रहाटणी फाटा ते रहाटणी गाव, नखाते वस्ती ते कुणाल हॉटेल, नखाते वस्ती ते आकाशगंगा गार्डन या भागांतील रस्त्यांची दुरवस्था
     रहाटणी गाव ते काळेवाडी फाटा, वाकड येथील कस्पटेवस्ती, हिंजवडी, पिंपळे गुरव, आकुर्डी, भोसरी या भागांतही अशाच पद्धतीने कामे सुरू
     चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाजवळ जलवाहिनीचे काम रखडले
     चिंचवडेनगर, साईराम कॉलनीकडून प्राधिकरणाकडे जाणारा मार्गावर खड्डेच खड्डे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com