esakal | म्हाडाच्या दोन हजार 908 सदनिकांसाठी गुढीपाडव्याला प्रारंभ 

बोलून बातमी शोधा

draw of 2 thousand 890 flats of MHADA Inauguration of the application process Deputy Chief Minister

उपमुख्यमंत्री पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दूरदृश्य प्रणालीद्वारे पवार यांच्या हस्ते गृहनिर्माण योजनेतील दोन हजार 908 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला.

म्हाडाच्या दोन हजार 908 सदनिकांसाठी गुढीपाडव्याला प्रारंभ 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळातर्फे दोन हजार 908 सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला. या माध्यमातून 'सन 2022 - सर्वांसाठी घरे' या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने राज्य सरकारने आश्वासक पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दूरदृश्य प्रणालीद्वारे पवार यांच्या हस्ते गृहनिर्माण योजनेतील दोन हजार 908 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई आदी उपस्थित होते.   

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. प्रास्ताविक ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी  नितीन माने यांनी केले. 

29 मे रोजी सोडत :
 https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका आणि अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. 29 मे रोजी प्राप्त अर्जाची सोडत पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर येथील कार्यालयात सकाळी दहा वाजता होणार आहे.

याठिकाणी सदनिका उपलब्ध : 
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) :
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) या माध्यमातून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे 209, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे 432 अशा एकूण 641 सदनिका. या सर्व सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. 

म्हाडा गृहनिर्माण योजना
अल्प उत्पन्न गटासाठी मोरवाडी पिंपरी (पुणे) येथे 14 सदनिका

मध्यम उत्पन्न गटासाठी मोरवाडी पिंपरी येथे 2 सदनिका
 

20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी पुणे महापालिका हद्दीतील लोहगाव, बाणेर, हडपसर, धनकवडी, खराडी, वडगाव शेरी, येवलेवाडी येथील 300 सदनिकांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळे निलख, ताथवडे, किवळे, पुनावळे, मोशी, वाकड, रावेत,  रहाटणी, चरोली, चिखली, उरवडे, डुडुळ गाव येथील 455 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. 

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य :
या योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी जुळे सोलापूर येथे 5 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी जुळे सोलापूर येथे 63 सदनिका, चाकण-म्हाळुंगे-इंगळे येथे 499 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी चाकण-म्हाळुंगे-इंगळे, चिखली येवलेवाडी, वडमुखवाडी येथे 862 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी चाकण-म्हाळुंगे-इंगळे येथे 67 सदनिका उपलब्ध आहेत.
 

14 मेपर्यंत ऑनलाइन नोंदणी : 
13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व नोंदणीकृत अर्जदार ऑनलाईन अर्ज करु शकतील. ऑनलाईन अर्ज नोंदणी 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. 14 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. 15 मे रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. 16 मे रोजी संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल.