मुलांच्या चित्रांना दाद (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘कोणतीही कला ही छंदापुरती मर्यादित नसते, तर ती एक प्रकारची शैक्षणिक गुणवत्ता आहे. कारण कला ही सहज येत नाही. अभ्यास करून आपण शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो; पण कलेचं तसं नसतं. कलेसाठी जास्त सर्जनशीलता लागते,’’ असे मत ज्येष्ठ चित्रकार सुधाकर चव्हाण यांनी व्यक्त केले. 

मुलांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन ‘स्ट्रोक आर्ट इन्स्टिट्यूट’तर्फे बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आठवले फूड्‌सच्या संचालिका मैत्रयी आठवले, प्रेझिन सोल्युशनच्या प्रिया कुलधरन, नीलेश कुलधरन, ‘स्ट्रोक आर्ट’च्या संचालिका स्नेहल कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, ‘‘कोणतीही कलात्मक गोष्ट आपल्यासमोर येते तेव्हा त्या कलेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते; पण त्या कलेच्या निर्मिती प्रक्रियेकडे आपला दृष्टिकोन वळत नाही. वर्षानुवर्षे चित्रकलेकडे शाळेत विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा, या उद्देशानेच बघितले जाते. हा शाळेतला चित्रकलेचा पॅटर्न निरस आहे.’’ 

हे प्रदर्शन २९ डिसेंबरपर्यंत सकाळी नऊ ते साडेआठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात ग्लास पेंटिंग, स्टेन पेंटिंग, व्हॅक्‍स क्रेऑन पेंटिंग, फिंगर पेंटिंग अशी विविध प्रकारची लहान मुलांनी साकारलेल्या चित्रांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी बुधवारी अनेकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन चित्रांना दाद दिली.

Web Title: Drawing Exhibition