डीआरडीओतर्फे मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

ही योजना 2020-21 या शैक्षणिक कालावधीतील अभियांत्रिकीच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात असलेल्या, तसेच एरोस्पेस, एरोनॉटिकल, स्पेस व रॉकेट्री, एव्हिओनिक्‍स किंवा एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग विषय असलेल्या, मुली किंवा महिला उमेदवारांसाठी आहे. 

पुणे ः संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) "एरोनॉटिक्‍स रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड' (एआर अँड डीबी) मार्फत नुकतीच मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्जभरण्याची अंतिम तारीख ही 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही योजना 2020-21 या शैक्षणिक कालावधीतील अभियांत्रिकीच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात असलेल्या, तसेच एरोस्पेस, एरोनॉटिकल, स्पेस व रॉकेट्री, एव्हिओनिक्‍स किंवा एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग विषय असलेल्या, मुली किंवा महिला उमेदवारांसाठी आहे. 

देशातील तेजस्वी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उंचावण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली असून योजने अंतर्गत एकूण 30 रिक्त जागा ठेवण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्तीसाठी जेईई आणि गेट (मुख्य) परीक्षेच्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याकरिता व या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी
rac.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DRDO extends application for scholarship scheme for girls