डीआरडीओकडून डॉ. कलाम यांच्या पुण्यतिथिनिमित्त स्पर्धेचे आयोजन; नवउद्योजकांसाठी संधी

अक्षता पवार
Tuesday, 28 July 2020

- डीआरडीओच्या वतीने 'डेअर टू ड्रीम 2.0' स्पर्धेचे आयोजन
- आत्मनिर्भर संकल्पने अंतर्गत नवउद्योजकांसाठी संधी

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने भारताचे पूर्व राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांच्या 5व्या पुण्यतिथि निमित्त 'डेअर टू ड्रीम 2.0' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील विविध 'स्टार्टअपस'ला संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'आत्मनिर्भर भारत' या संकल्पने अंतर्गत डीआरडीओ मार्फत नुकतेच खासगी उद्योगांबरोबर करार करण्यात आले होते. तर याच संकल्पनेला चालना देण्यासाठी, संरक्षण क्षेत्रात नवनवीन उत्पादनासाठी तसेच नवउद्योजकांना संधी उपलब्ध व्हावी या हेतूने ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेतेपद पटकवणाऱ्या स्टार्टअप्सला पुरस्कार देण्यात येणार असून या स्पर्धेसाठी तज्ज्ञांचा गट तयार करण्यात आला आहे.

स्पर्धेबाबतची अधिक माहिती लवकरच डीआरडीओच्या www.drdo.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डीआरडीओच्या 'डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्री इंटरफेस अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट' (डीआयआयटीएम) मार्फ़त देण्यात आली आहे.

"देशातील कानाकोपऱ्यात आज अनेक अशे युवक आहेत ज्यांच्याकडे कौशल्य आणि प्रतिभा आहे. परंतु आर्थिक परिस्थिती किंवा चांगल्या प्रकारचे व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांच्या कौशल्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी नवीन कल्पना व तंत्रज्ञान विकसित करण्याऱ्या अश्या युवकांना संधी मिळावी यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. - डॉ. मयंक द्विवेदी, संचालक - डीआयआयटीएम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DRDO Organizing a competition on the occasion of Dr. Kalams death anniversary