डीआरडीओचे 'पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोझर' आणि 'फेसशिल्ड'

DRDO Personal Sanitization Enclosure and Face Shield
DRDO Personal Sanitization Enclosure and Face Shield

पुणे : कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये विविध वैद्यकीय संसाधनांचा उत्पादनाचे कार्य वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर डीआरडीओच्या वतीने आणखीन दोन यंत्रणे तयार करण्यात आले आहेत.

यामध्ये अहमदनगर येथील वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (व्हीआरडीई) येथे 'पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोझर'ला तयार करण्यात आले आहे. या वैयक्तिक स्वच्छता बंदीस्त कक्षमध्ये एकावेळी एक व्यक्तीचा संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण केले जाते. सॅनिटायझर व साबणाची सुविधा असलेला हा एक 'पोर्टेबल सिस्टम' आहे. या निर्जंतुकीकरण कक्ष मध्ये प्रवेश करताच यातून सॅनिटायझरची फवारणी सुरू होते. एकूण 25 सेकंदातच ही प्रक्रिया पूर्ण होते.

याचबरोबर हैद्राबाद आणि चंडीगड येथील आरसीआय व टीबीआरएल या प्रयोगशाळांमध्ये चेहऱ्याच्या संरक्षणासाठी 'फेसशिल्ड'ची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा संपर्कात असलेल्या डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला हा फेसशिल्ड हलक्या वजनाचा असून याचा वापर दीर्घ कालावधीसाठी केला जाऊ शकतो. हे फेसशिल्ड जैवघटनायोग्य (बायोडीग्रडेबल) आहेत.

पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोझरचे वैशिष्ट्य
-ही यंत्रणा चार दिवसांच्या कालावधीत तयार करण्यात आली
-सुमारे 700 लीटरची क्षमता
-रीफिलची आवश्यकता होईपर्यंत सुमारे 650 कर्मचारी निर्जंतुकीकरणासाठी चेंबरमधून जाऊ शकतात
-रुग्णालये, मॉल्स, कार्यालयीन इमारती सारख्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या निर्जंतुकरणासाठी याचा वापर केला जाऊ शकतो


आरसीआय आणि टीबीआरएलच्या वतीने दररोज प्रत्येकी 100 फेसशिल्ड तयार करण्यात येत असून हे फेसशिल्ड हैद्राबाद येथील ईएसआयसी व चंडीगडच्या पीजीआयएमइआर या रुग्णालयांना पुरविण्यात येत आहेत. या फेसशिल्डचा यशस्वी वापराच्या चाचण्यांवर आधारित पीजीआयएमईआर आणि ईएसआयसी रुग्णालयांकडून आणखीन दहा हजार फेसशिल्डची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com