
भोर : भोरमधील शेटेवाडी येथील २५ वर्षीय अक्षता नरेश शेटे हिने एव्हिएशन (हवाई) क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. नामांकित कंपनी इंडिगो एअरलाईन्समध्ये, एअर होस्टेस (हवाई सुंदरी) म्हणून तिची निवड झाली असून, दिल्ली येथे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ती २५ ऑगस्टपासून कार्यरत होत आहे.