दुर्गम भागातील गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये दरवर्षी डिसेंबर महिना संपताच पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते.
Supriya Sule
Supriya Sulesakal
Summary

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये दरवर्षी डिसेंबर महिना संपताच पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) बारामती लोकसभा मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावे (Village) आणि वाड्या-वस्त्यांमध्ये दरवर्षी डिसेंबर महिना संपताच पिण्याची पाण्याची (Drinking Water) तीव्र टंचाई (Water Shortage) निर्माण होत असते. या गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी या गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोमवारी (ता.२५) पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

या भागातील शेती दरवर्षी उन्हाळ्यात पडीक ठेवावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून या समस्येवर उपाययोजना करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेता, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जुन्या पाणीटंचाई आराखड्यासोबतच पुरवणी टंचाई आराखड्यातील गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

खासदार सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी टंचाई व अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता.२५) जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी ही मागणी केली. या बैठकीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, अमित कंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी होळकर, माणिकराव झेंडे, त्र्यंबक मोकाशी, महादेव कोंढरे, योगिनी दिवेकर आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, ‘या लोकसभा मतदारसंघाचा बराचसा भाग डोंगरी आणि दुर्गम भागात येतो. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. परंतु या ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी वाहून जाते. जमिनीची पाणी साठवण क्षमताही कमी आहे. या परिसरात पाण्याचे नैसर्गिक साठे कमी प्रमाणात आहेत. डोंगरी भागाबरोबरच मतदारसंघातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती या तालुक्यांचा बराचसा भाग हा पर्जन्यछायेत येत आहे. परिणामी दरवर्षी पाणी टंचाई भेडसावत असते. वाढत्या उन्हामुळे डिसेंबर महिन्यानंतरच या परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com