leopard
sakal
जुन्नर - जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मानव-बिबट संघर्ष तीव्र झाला आहे. तालुक्यासोबतच शेजारील आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांतदेखील बिबट्याच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सध्या रब्बी हंगामाच्या पिकांच्या लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनाकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.