चालक हॅन्डब्रेक न लावताच बसमधून उतरला अन् उतरावरुन...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

कात्रज स्थानकावर कात्रज - महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (येरवडा) मार्गावर जाण्यासाठी बस सकाळी साडेसातच्या सुमारास उभी होती. बसची पहिलीच ट्रिप होती. त्यावेळी बस उभी करून चालक पिराजी जगन्नाथ दिवटे हे वाहकाला बोलविण्यासाठी गेले. त्यावेळी बस उतारावरून पुढे स्वारगेटच्या दिशेने गेली. बाह्यवळण रस्त्याच्या अलिकडे रस्त्यात थांबलेल्या रिक्षाला बस धडकली

पुणे : सकाळी सातची वेळ....कात्रजचा गजबजलेला चौक...नेहमी प्रमाणे कात्रजच्या बस थांब्यावर प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार थांबले होते....अन् अचानक कात्रज ते हौसिंग बोर्ड मार्गाची बस स्वारगेटच्या दिशेने उतरावरुन खाली येऊ लागली...अन् दत्तनगरच्या रस्त्यावर असलेल्या 2 रिक्षांना जाऊन धडकली....एवढ्यावरच बस थांबली नाही...ही बस धडकून कात्रच्या मुख्य चौकाकडे निघाली....आरडा ओरडा करत नागरिकांनी पळापळ सुरु झाली...तेवढ्यात एका टॅक्सी चालकाने जीवाची बाजी लावत बसच्या मागच्या दारातून आत शिरला.... तोपर्यंत पुणे-मुंबई बायपास चौकापर्यंत  पोहचली....पुढे सिग्नलवरील वाहनांना धडकण्यापुर्वी त्याने ब्रेक मारुन गाडी थांबवली अन् पीएमपी बसचा काही काळ सुरु असलेले हे थरार नाट्य थांबले. बस उतारावर उभी असताना हॅन्डब्रेक न लावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले अन् चालकाला बडतर्फ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने मंगळवारी घेतला. स्वारगेट स्थानकावरील तीव्र उतारामुळे गेल्या दोन वर्षांत झालेला हा चौथा अपघात आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

कात्रज स्थानकावर कात्रज - महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (येरवडा) मार्गावर जाण्यासाठी बस सकाळी साडेसातच्या सुमारास उभी होती. बसची पहिलीच ट्रिप होती. त्यावेळी बस उभी करून चालक पिराजी जगन्नाथ दिवटे हे वाहकाला बोलविण्यासाठी गेले. त्यावेळी बस उतारावरून पुढे स्वारगेटच्या दिशेने गेली. बाह्यवळण रस्त्याच्या अलिकडे रस्त्यात थांबलेल्या रिक्षाला बस धडकली. त्यानंतर पुढे आणखी एका रिक्षाला बस धडकली. चौकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहनांना बस धडकणार, तेवढ्यात दिगंबर कोराळे या टॅक्‍सीचालकाने चालत्या बसमध्ये प्रवेश केला. ड्रायव्हरच्या जागेवर जाऊन त्याने ब्रेक दाबला. त्यानंतर बस थांबली. हा प्रकार पाहून स्थानकावरील पीएमपीचे अधिकारी, कर्मचारी बसकडे धावले. त्यांनी दिगंबरचे कौतुक केले. त्याने बस थांबविली नसती तर, ती आणखी काही वाहनांना धडकून दुर्घटना घडली असती.

...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार

या घटनेनंतर पीएमपीच्या अपघात विभागाचे प्रमुख सुनील कुसाळकर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन बसची पाहणी केली. त्यात बसला हॅन्डब्रेक लावलेला नव्हता, असे आढळून आले.. या घटनेत बसचालक दिवेट यांचा निष्काळजीपणा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. कात्रज स्थानकावर बस दोन रिक्षांना धडकल्यावर लगेचच प्रशासनाने हा निर्णय घेतला.

सलूनमध्ये शिरुन दोघांवर केले ब्लेडने वार; दिली जिवे मारण्याची धमकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver Forgot to use Handbrake caused Bus Accident in Katraj PMT Depot Pune