Devendra Fadnavis: आळंदीत मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते, तेवढ्यातच पडला ड्रोन अन्...; पुढं काय घडलं ?

Devendra Fadnavis Drone Incident: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीमध्ये होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अचानक ड्रोन येऊन पडला आहे. यानंतर खळबळ उडाली होती.
Devendra Fadnavis Drone
Devendra Fadnavis DroneESakal
Updated on

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना एक ड्रोन अचानक मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने या प्रकारात कुणालाही इजा झालेली नाही. या घटनेत सापडलेला ड्रोन पोलिसांनी जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com