पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

युनूस तांबोळी
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे आवश्यक आहे. टँकर सुरू झाला पण त्याच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे. विजेच्या समस्यांमुळे नागरीक हैराण झाले असून, थोड्याशा पाण्यात विज नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या नाराजीचा प्रतिक्रिया शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई व मिडगूलवाडी येथील नागरीकांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या समोर मांडल्या.

कान्हूर मेसाई व मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील दुष्काळी भागाची पहाणी करून नागरीकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, जिल्हा परीषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, विश्वास कोहकडे, डॅा. वर्षी शिवले, सवीता बगाटे, प्रदिप वळसे पाटील, सवीता पऱ्हाड, राजेंद्र गावडे, अरूणा घोडे, नायब तहसीलदार एस. यु. शेख, ग्रामीण पुरवठा अधिकारी एस. आर. गायकवाड, दादा खर्डे, दामु घोडे, योगेश थोरात, बंडू पुंडे, दिपक तळोले, सुनील मिडगुले, मोहन मिडगुले आदी विविध खात्यातील पदाधिकारी, सरपंच आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

वळसे पाटील म्हणाले की, राज्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परीस्थीती जाणवू लागली आहे. शिरूर व आंबेगाव भागात गंभीर दुष्काळी परीस्थीतीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळी परीस्थीतीमुळे हातातील पिके नष्ठ झाली आहेत. आठ महिने दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चारा, नुकसान भरपाईची मागणी, रोजगार हमीच्या कामाची गरज निर्माण झाली आहे. दुष्काळी भागातील या परीस्थीती बाबत सरकार गंभीर नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात या बाबत आवाज उठविला जाऊन सरकारला दुष्काळी परीस्थीती बाबत धारेवर धरणार आहे. दुष्काळी परीस्थीतीला सामोरे जात असताना कार्यकर्त्यांनी गावपातळीवर नागरीकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सामान्यांच्या प्रश्नाला बांधील...
दुष्काळी परीस्थीती असल्याने पिण्याच्या पाण्याचा, चारा तसेच रोजगाराचा प्रश्न मार्गी लावू. विरोधी सरकार म्हणून भूमीका मांडत असलो तरी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. परीसरातील पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर झाल्या असून नजीकच्या काळात त्या मार्गी लावण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: drought and water issue in shirur taluka