Pune Drought : मंचर, घोडेगाव, कळंब, पारगाव चार मंडल कार्यक्षेत्रामध्ये ११६ गावांमध्ये दुष्काळ जाहीर - दिलीप वळसे पाटील

विद्यार्थी व शेतकऱ्यांना मिळणार सवलती
drought announced in 116 villages in manchar ghodegaon kalamb pargaon four mandals dilip walse patil
drought announced in 116 villages in manchar ghodegaon kalamb pargaon four mandals dilip walse patilSakal

मंचर : “आंबेगाव तालुक्यात मंचर, घोडेगाव, कळंब, पारगाव, या चार मंडल कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या ११६ गावांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार येथील शेतकरी विद्यार्थ्यांना शासनाकडून आवश्यक त्या सवलती मिळतील.” असे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे झालेल्या पत्रक्कर परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कार्याध्यक्ष निलेश थोरात, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, दत्ता थोरात उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले “राज्य सरकारने काही तालुके दुष्काळी जाहीर केले होते पण त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे पाऊस कमी पडूनही वंचित राहिली होती. या गावांची पर्जन्य परिस्थितीचा अहवाल महसूल खात्याकडून नुकताच राज्य शासनाकडे प्राप्त झाला.

त्यानुसार तातडीने रविवारी (ता.११) राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीतील शासन निर्णयानुसार आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, कळंब, पारगाव या चार मंडल कार्यक्षेत्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.”

“आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात गेली दोन दिवस मुसळधार झालेल्या पावसाने भात पिकाचे व खासराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिल्या आहेत.

त्यानुसार महसूल व कृषी खात्याच्या कर्मचार्यांनी पंचनामे प्रक्रिया सुरु केली आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीतनिर्णय घेऊन या भागातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल.” असे वळसे पाटील यांनी सांगितले.

  • जमीन महसूलात सूट

  • सहकारी कर्जाचे पुनर्गठन

  • शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती

  • कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट

  • शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी

  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर

  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत केली जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com