दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचे हात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - मराठवाडा - विदर्भात दुष्काळ पडल्यानंतर त्याचा परिणाम या भागांतून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर कसा होतो. यावर ‘दुष्काळामुळे विद्यार्थ्यांवर रोजंदारीची वेळ’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केली होती. समाजाच्या विविध स्तरांतून या बातमीला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी या विद्यार्थ्यांसाठी मदतीचे हात पुढे केले आहेत.

मराठवाड्यातील काही विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘स्टुडंट हेल्पिंग हॅंड संस्थेच्या’ माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना खाणावळ, राहण्याची सोय, पार्टटाइम नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दुष्काळग्रस्त परिषदेचे आयोजन केले आहे. पुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विद्यार्थांचे गट, व्यावसायिक तसेच वैयक्तिकरीत्या अनेक जण या तरुणांना मदत करण्यास तयार आहेत. स्टॉक टॅली कंपनीचे संस्थापक संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी त्यांच्या कंपनीमध्ये किमान शंभर मुलांना पार्टटाइम नोकरी देण्यासाठीचे आश्‍वासन दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्च न करता दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तो खर्च करावा असा शरद पवार यांचा आदेश आहे. त्यानुसार पुण्यात राहणाऱ्या किमान १०० दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या एक वेळच्या जेवणाचा सहा महिन्यांचा खर्च आम्ही करणार आहोत.
- नितीन कदम, अध्यक्ष पर्वती मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. खरिपाचे पीक बुडाले असून, कापूस व सोयाबीन या दोन्ही मुख्य पिकांना मोठा फटका बसला आहे.  याचा परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर होतो, यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे.
- प्रा. एच. एल. देसरडा, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

Web Title: Droughtaffected Student Help