Pune Crime : कुरिअर पार्सलमध्ये मेफेड्रॉन असल्याचे सांगून आयटी अभियंत्याला फसवले

मनी लॉड्रिंग प्रकरणात तुमचे आधारकार्ड वापरले गेले आहे,’’ असे त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले
drug courier parcel contained mephedrone fraud with IT engineer crime marathi news pune
drug courier parcel contained mephedrone fraud with IT engineer crime marathi news puneesakal

पुणे : दुपारी १२.३० ची वेळ. पुण्यातील खराडी येथील एका आयटी अभियंत्याला अंधेरीहून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून कॉल आला. समोरील व्यक्ती एका कुरिअर कंपनीतून बोलत होती. ‘‘तुम्ही मुंबई ते तैवान पाठविलेल्या कुरिअर पार्सलमध्ये १४० ग्रॅम मेफेड्रॉन अमली पदार्थ आढळले आहे.

तसेच मनी लॉड्रिंग प्रकरणात तुमचे आधारकार्ड वापरले गेले आहे,’’ असे त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले. या कॉलमुळे आयटी अभियंता क्षणभर गोंधळून गेला. कारण प्रत्यक्षात कुरिअर पाठवलेले नसताना हा कॉल आला होता. अनोळखी व्यक्तीने ही बाब पोलिसांना कळवत असल्याचे सांगितले. शिवाय आयटी अभियंत्याला मोबाईलवर एक लिंक पाठवून माहिती मागवली. त्या लिंकवर माहिती देताच अभियंत्याच्या बॅंक खात्यातून तीन लाख रुपये ट्रान्स्फर झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयटी अभियंत्याने (वय ३२, रा. थिटे वस्ती, खराडी) सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी हे प्रकरण चंदननगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले.

त्यानुसार चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सध्या अशा प्रकारे कुरिअर पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक होत आहे. विशेषत: आयटी अभियंत्यांबाबत अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तशा तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.

असे फसवतात सायबर गुन्हेगार

नोकरदार, व्यावसायिकांना हेरून त्यांची फसवणूक करणारी सायबर गुन्हेगारांची टोळी कार्यरत आहे. या टोळीतील एक महिला सफाईदार इंग्रजी भाषेत कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगते. तुम्ही परदेशात पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळली आहे. त्यासाठी तुमचे आधारकार्ड वापरले आहे.

त्यामुळे तुम्ही आता क्राइम ब्रॅंचच्या पोलिस अधिकाऱ्याशी बोला, असे सांगून तो कॉल जोडून देते. त्यावेळी तो कॉल क्राइम ब्रॅंचमध्ये जोडला जात आहे, असा आवाज ऐकू येतो. त्यानंतर तोतया अधिकारी पोलिसी खाक्यात तुम्हाला पाठविलेल्या लिंकवर तुमची माहिती द्या, असे बजावतो.

त्यामुळे काहीजण गुन्हा न करताही माहिती देतात आणि तेथेच फसवणूक होते. परंतु काही चाणाक्ष व्यक्तींना तो बनावट कॉल असल्याचे लक्षात येते. ते सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला किंवा भीतीला बळी पडत नाहीत. त्यांची फसवणूक होता होता टळली आहे.

मला कुरिअर पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचा कॉल आला होता. त्यांनी मुंबई क्राइम ब्रॅंचच्या कथित अधिकाऱ्याशी फोनही जोडून दिला. त्या अधिकाऱ्याने तुमचे नाव काय, असे विचारले. मी पार्सल पाठवले नव्हते. मला फोन केला असेल तर माझे नाव का विचारत आहेत. त्यामुळे मला संशय आला. त्यांनी पाठवलेल्या लिंकवर मी माहिती दिली नाही. त्यामुळे माझी फसवणूक टळली.

- गणेश खोटाले, आयटी अभियंता, पुणे

हेल्पलाइन क्रमांक- १९३०

सायबर पोलिस ठाणे क्रमांक- ७०५८७१९३७१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com