भारती विद्यापीठात नशामुक्त अभियान

भारती विद्यापीठात नशामुक्त अभियान
Published on

भारती विद्यापीठात नशामुक्त भारत अभियान

सोलापूर, ता. ८ : येथील भारती विद्यापीठ, अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेसमध्ये रासयो व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात आले.
प्रारंभी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या शैक्षणिक, वैयक्तिक व सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे सदस्य रमेश खाडे, एफ. एस. पुजारी, महादेव कासू उपस्थित होते. बाळू परबत यांनी युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये. आजचा युवक मोबाईलच्या अतिवापराच्या व्यसनात अडकत चालला आहे. मोबाईलच्या अनियंत्रित वापरामुळे युवकांच्या विचारशक्ती, एकाग्रता आणि सर्जनशीलतेवर विपरित परिणाम होऊ शकतो, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले.
विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाची सकारात्मक शपथ घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com