Pune Crime : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात

ससून रुग्णालयातून पसार झालेल्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे.
lalit patil
lalit patilEsakal

पुणे - ससून रुग्णालयातून पसार झालेल्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे. ललितला मुंबई येथून मंगळवारी (ता. ३१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आणण्यात आले. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस तपासात ललितकडून तस्करीच्या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

ललित पाटील दोन ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून फरार झाला होता. ललितला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी चेन्नईहून अटक केली होती. मुंबईतील न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. पोलिसांनी ललितला अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ललितला अटक करण्याबाबत वॉरंट बजावले होते. गुन्हे शाखेची तीन पथके कालच मुंबईला रवाना झाली होती. न्यायालयीन कोठडीतून ललितसह अन्य आरोपी शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या तिघांना रात्री पुण्यात पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले.

पुणे पोलिसांनी यापूर्वी ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अऱ्हाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन त्यांची न्यायालयीन कोठडी घेतली आहे.

ललितला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा त्यांना चौकशीसाठी पोलिस कोठडीत घेतले जाण्याची शक्यता आहे. चौकशीत ललितला पळून जाण्यात कोण मदत केली? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com