Pune Crime : चरस तस्करी प्रकरणातील मुख्य सुत्रधारास हरियाणातून अटक

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, 10 लाख रूपयांचा ऐवज जप्त
drug case
drug casesakal media

पुणे : मोठ्या प्रमाणात चरस या अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या मुख्य आरोपीस पुणे पोलिसांनी हरियाणा येथे जाऊन अटक केली. आरोपीकडुन यापूर्वीच 10 लाख रुपये किंमतीचे चरस, मोबाईल जप्त केला आहे. आरोपीला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भरत श्यामसुंदर भोमिक (वय 37, रा. दयानंद कॉलनी, हिसार, हरियाणा) असे हरियाणा येथून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विकास बब्बरसिंह इटकान (वय 22, रा. भारतनगर, हिंसार हरियाणा) यास खडकी बाजार येथून अटक केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी पथकाचे (1) पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्या पथकाने खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दित गस्त घालत होते. त्यावेळी खडकी बाजार बस स्थानकासमोरील सार्वजनिक रस्त्यावर विकास इटकान हा फिरत होता. पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली. तेव्हा, त्याच्या बॅगमधून 10 लाख 10 हजार 500 रूपये किंमतीचा एक किलो चरस, मोबाईल जप्त केला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना त्यांना चरस तस्करीतील मुख्य सुत्रधार हरियाणा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने लक्ष्मण ढेंगळे, अमंलदर सुतिज वाडेरक, संदीप जाधव, विशाल दळवी, पांडुरंग पवार, विशाल शिंदे यांच्या पथकाने हरियाणातील हिसार येथे जाऊन 19 ऑक्टोंबर मुख्य सूत्रधार भोमिक यास अटक केली. न्यायालयाने त्यास 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com