

mephedrone drugs seized in balewadi
sakal
बालेवाडी - बालेवाडी येथील ममता चौक परिसरात नार्कोटिक्स विभाग आणि बाणेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुंबईहून आलेल्या एका चारचाकी वाहनातून ९८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. सुमारे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, परिसरात चर्चेला उधाण आले आहे.