
Drunk Doctor on Duty
Sakal
पुणे : कर्तव्यावर असताना दारू पिऊन ‘तर्राट’ झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने नशेतच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा प्रयत्न केला. संबंधित डॉक्टर हा नशेत असल्याचे लक्षात येताच नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित डॉक्टरला घेराव घालत त्याला जाब विचारत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. हा प्रकार बुधवारी (ता. २४) जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात घडला असून, आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरची समितीद्वारे चौकशी केली असून, लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे.