
पुणे : स्वारगेटवरून ठाण्याला जाणाऱ्या ‘ई-शिवनेरी’चा चालक प्रवाशांनी भरलेल्या बसमध्येच दारू पीत बस चालविताना आढळून आला. बस वारजे येथे पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित चालक हा ठेकेदारांचा आहे. घटनेनंतर त्याला संबंधित कंपनीने बडतर्फ केले असून, एसटी प्रशासनदेखील त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वारजे परिसरात घडली. वारजे पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले आहे.