Katraj News : कात्रज परिसरात मद्यपींचा उपद्रव; नागरिकांना नाहक त्रास, पोलिसांचे दुर्लक्ष

कात्रज परिसरात मद्यपींचा उपद्रव वाढला असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
bottle of wine
bottle of winesakal

कात्रज - कात्रज परिसरात मद्यपींचा उपद्रव वाढला असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या दारु विक्री केंद्राच्या बाहेरच दुचाकीवर बसून किंवा अन्य वाहनांचा आडोसा घेऊन रस्त्यावरच मद्यपी मद्यपान करत असल्याचे दिसून येते.

राजमाता भुयारी मार्गाजवळ उभारण्यात आलेल्या राजमाता उद्यानाची भिंत मद्यपींचा अड्डा बनली आहे. समोरच असलेल्या वाईन शॉपमधून मद्यपी दारू घेतात आणि उद्यानाच्या भिंतीजवळ रिक्षात किंवा दुचाकीवर बसून पितात. याठिकाणी रिक्षात बसून किंवा दुचाकींवर पत्ते मांडून जुगाराचा खेळही सर्सास खेळला जातो.

त्याचबरोबर, कात्रज चौकानजीक मुंबई रस्त्यावर आणि कात्रज पोलिस चौकी परिसरातही हा प्रकार सर्सास घडताना दिसतो. याकडेही पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कात्रज पोलिस चौकी परिसरात तर शंभर मीटरवर अंतरावर ही चौकी असूनही यावर नियंत्रण नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

या मद्यपींकडून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना अपशब्द वापरणे, जाणीवपूर्कक खोडी काढणे अशा घटना वारंवार घडत असतात. अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्यांचा खचही पडल्याचे दिसून येते. असे प्रकार सातत्याने होत असल्याचे ओरड नागरिकांतून आहे. मात्र, वादाचा विषय असल्याने नागरिक बोलणे टाळत असल्याचे दिसून येते. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून अशा ठिकाणी काहीतरी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया

रस्त्यावर मद्यपान करणे चुकीचे आहे. तसे करण्यावर बंदीही आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणीही करत असल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. यापुढे याठिकाणी असे प्रकार होणार नाहीत याची काळजी पोलिस प्रशासन घेईल.

- दशरथ पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

रस्त्यावर मद्यपान करण्याचा प्रकार हा दररोजचा झाला आहे. यावर कोणाचेही निर्बंध नसल्यासारखे मद्यपी वागत असतात. अनेकवेळा यामुळे वादही झाले आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

- विकास बिक्कड, स्थानिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com