डीएसके यांच्या आठ वाहनांचा लिलाव करण्यावर आक्षेप; केली ही मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पुणे : लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये असा, अर्ज सोमवारी डीएसके प्रकरणात बचाव पक्षाकडून येथील विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये असा, अर्ज सोमवारी डीएसके प्रकरणात बचाव पक्षाकडून येथील विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीच्या आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील 8 वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रदीप राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला आहे. ही आठही वाहने आलिशान व महागडी आहेत. 

अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

आठ वाहने शिरीष कुलकर्णी यांच्या नाही तर कंपन्यांच्या मालकीची आहे, हे लक्षात आल्यानंतर आम्ही अर्ज केला. वाहनांच्या मालकीबाबतचे कागदपत्रे सादर केल्याचे ऍड. राजोपाध्ये यांनी न्यायालयास सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी या अर्जास विरोध केला. संबंधित अर्ज शिरीष कुलकर्णी यांच्या नावाने करण्यात आला आहे. फौजदारी संहिता कायद्यामध्ये पुनर्विचार करण्याची तरतूद नाही. त्यामुळे आहे तोच आदेश न्यायालयाने कायम ठेवावा, असा युक्तिवाद ऍड. चव्हाण यांनी केला.

भारताचा विकासदर राहणार एवढा; फिच रेटिंग्सचे अनुमान

आक्षेपाचे सुमारे 20 अर्ज 
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक जप्त करण्यात आलेल्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढण्यात आली आहे. संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदविण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार या संपत्तीबाबत सुमारे 20 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यात सांगली सरकारी बॅंक आणि ईडी यांची देखील प्रत्येकी एक हरकत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSKs objection to auctioning on his eight vehicles