जेजुरीच्या तरुणांनी घडवला पाणीदार चमत्कार

तानाजी झगडे
Wednesday, 16 September 2020

जेजुरी शहरामध्ये अकरा एकरामध्ये दगडी कामातील ऐतिहासिक होळकर तलाव आहे. पूर्वी हा तलावाचा उपयोग शहराच्या व भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जायचा.

जेजुरी (पुणे) : जेजुरी शहरातील ऐतिहासिक होळकर तलाव भरण्यासाठी कडेपठारच्या डोंगरातील पाणी वळविण्यात आले आहे. त्यामुळे तलावात पाणीसाठा वाढत आहे. येथील जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने हे काम करण्यात आले. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांना रडवलेच

जेजुरी शहरामध्ये अकरा एकरामध्ये दगडी कामातील ऐतिहासिक होळकर तलाव आहे. पूर्वी हा तलावाचा उपयोग शहराच्या व भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जायचा. सध्या या तलावामुळे शहरातील विहिरी व विंधनविहीरींना चांगले पाणी राहते. तलावातील पाणीसाठा जास्त दिवस टिकून राहत असल्याने परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी चांगली राहते. या तलावात पावसाचे पाणी येत नव्हते. यासाठी येथील जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने तलावाकडे येणाऱ्या ओहळमध्ये कडेपठारच्या डोंगरातील दोरगेवाडी परिसरातील ओढ्याचे पाणी वळविण्यात आले. त्यामुळे होळकर तलावात पाणीसाठा होण्यास सुरवात झाली आहे. 

यंदा अधिक मासावरही कोरोनाचे संकट, जावईबापूंचा हिरमोड

असे झाले काम 
जय मल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल बारभाई, पदाधिकारी सचिन रणखांबे, गणेश गाढवे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला. या कामासाठी तानाजी खोमणे व सतीश सस्ते यांच्याकडून जेसीबी मशिन उपलब्ध झाले. फाउंडेशनच्या वतीने दोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढण्यात आला होता. तसेच, तलावाची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर आता या तलावात पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या तलावात कडेपठारच्या डोंगरातील एका ओढ्याचे पाणी येते. मात्र, ते कमी पडते. त्यासाठी कडेपठारच्या डोंगरातून दोरगेवाडीतील ओढ्याचे पाणी या तलावाकडे येणाऱ्या ओढ्याला जोडावे लागले आहे.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दवणेमळा येथील सर्व तलाव भरल्यानंतर हे पाणी होळकर तलावाकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी जेथून वळविण्यात येते, त्या ठिकाणी पाणी अडविण्याऱ्या दरवाजांची उभारणी व्हावी, म्हणजे दवणेमळा व होळकर तलाव या दोन्हीकडे पाणी सोडता येईल. सध्या होळकर तलावात हळूहळू पाणीसाठा वाढत आहे.  यापुढे पाऊस झाल्यास तलावात वेगाने पाणीसाठा होईल. 
- विशाल बारभाई, अध्यक्ष, जय मल्हार फाउंडेशन, जेजुरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the efforts of the youth, water came into the lake of Jejuri