रोजगारामुळे ग्रामीण भागातील महिला बनल्या स्वावलंबी

आदम पठाण
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक प्रगती साधता यावे यासाठी माजी सरपंच भागवत काटकर व शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन महिन्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तीन महिन्याच्या मिळालेल्या प्रशिक्षणामुळे 200 महिला घर बसल्या व्यावसाय करू लागल्या असून प्रशिक्षणामुळे रोजगार उपलब्ध झाल्याने या महिला स्वावलंबी बनल्या आहेत.   

ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या व्यवसायातून प्रगती व्हावी यासाठी तीन महिन्याच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन वडापुरी येथे करण्यात आले होते, ते प्रशिक्षण पूर्ण झाले असून 200 महिला घरच्या घरीच व्यवसाय करू लागल्या असल्याने या व्यावसायातून मिळणाऱ्या रोजगारातून महिलांची आर्थिक प्रगती होणार आहे. 

तीन महिन्याच्या प्रशिक्षण मध्ये पंजाबी ड्रेस डिझायनिंग कोर्स , ब्लाउज डिझायनिंग, अॅडव्हन्स ब्लाउज बेसीक ब्यूटी व ब्यूटी क्रॅश कोर्स इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यावेळी तरुणींसह महिलांनी सहभाग घेतला होता. भागवत काटकर व ट्रस्ट मार्फत आम्हाला मिळालेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामुळे आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून व्यावसाय मधून प्रगती साधता येणार असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले.

Web Title: Due to employment women become self sufficient in rural areas