माघी गणेश जयंतीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

माघी गणेश जयंतीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी
माघी गणेश जयंतीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

जुन्नर (पुणे): अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) माघी गणेश जयंतीनिमित्ताने भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. देवस्थानच्यावतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

आज पहाटे 4 वाजता विश्वस्त प्रभाकर गडदे यांच्या हस्ते श्री गिरिजात्मजास महाअभिषेक, पुजा व आरती करण्यात आली. यावेळी विवेक हाडवळे व खंडु गुंजाळ हे भाविक उपस्थित होते. पूजेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नामदेव महाराज वाळके यांचे श्री जन्माचे कीर्तन झाले. यानंतर पारंपारीक पद्धतीने गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, उपाध्यक्ष कैलास लोखंडे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, विजय वर्‍हाडी, काशिनाथ लोखंडे, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे तसेच कर्मचारी व भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनमार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लेण्याद्रीला दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते. यानिमित्ताने हार फुले प्रसाद विक्रीची तसेच विविध खाद्य पदार्थ व खेळणी साहित्याची दुकाने लावण्यात आली होती. दिवसभर पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येत येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com