#Banmanja माणुसकी संपल्यानेच कृपालीचा बळी

due to humanity loss krupalis death
due to humanity loss krupalis death

पिंपरी- पतंगाच्या मांजाने गळा चिरल्यानंतर डॉ. कृपाली निकम घटनेनंतर सुमारे 20 मिनिटे घटनास्थळी पडून होत्या. त्यांच्या गळ्यातून मोठा रक्तस्राव होत असल्याने एकही वाहनचालक त्यांना आत घेण्यास तयार नव्हता. 20 मिनिटांनी एका मोटारचालकाने गाडीतून खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर कृपाली यांना उपचार मिळाले असते, तर कदाचित त्या वाचल्या असत्या. आपली माणुसकी संपत आहे का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कासारवाडीत उड्डाण पूल चढतानाच कृपाली यांच्या गळ्याला मांजा अडकून त्या अचानक गाडीवरून कोसळल्या. त्या वेळी त्याठिकाणी थांबलेल्या लोकांपैकी सिद्धार्थ बोरावके यांनी अनेक चारचाकी वाहने थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही वाहन थांबले नाही. त्या वेळी डॉ. राजेंद्र वणवे यांनी एका मोटारचालकाच्या मदतीने कृपाली यांना पांजळपोळमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर लगेच कृपाली यांनी खिशातून त्यांचा मोबाईल काढून काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र, कंठातून आवाज निघाला नाही. दोन मिनिटांनी त्यांनी डोळे मिटले, तर पाच मिनिटांनंतर त्यांची हालचाल बंद झाली, असे प्रत्यक्षदर्शी बोरावके यांनी सांगितले. त्यांच्या गळ्याची नसच तुटल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अशा घटनांमध्ये पाच मिनिटांच्या आत उपचार मिळाल्यास संबंधिताला जीवदान मिळू शकते, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

कृपाली या पिंपळे सौदागर येथील ओएमपी रुग्णालयात काम करीत होत्या. तर त्यांचा भाऊ प्रतीक हा इंदिरा महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, तो आकुर्डीत राहतो. 

पोलिस घेताहेत दोषींचा शोध 
घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पतंगाचा मांजा हस्तगत केला आहे. कासारवाडी किंवा पिंपळे गुरवच्या अलीकडच्या भागात सायंकाळी काही जण पतंग उडवत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यामधील दोषींचा शोध सुरू असून, नागरिकांना याबाबत माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन सहायक निरीक्षक सुनील गाडे यांनी केले आहे. 

घटनाक्रम 
दुर्घटना सायंकाळी ः 6.30 
मोटारीतून रुग्णालयात हलवले ः 6.50 
रुग्णालयातून पोलिसांना माहिती ः 7.39

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com