अवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये वाढ

walchandnagar
walchandnagar

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नीरा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्यामध्ये वाढ झाली आहे. अवकाळी पावसाचा नीरा नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

मंगळवार (ता.२०) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी परीसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तासभर धो-धो पाऊस सुरु होता. या पावसामुळे खोरोची, निरवांगी व निमसाखर मधील नीरा नदीवरती असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.याचा फायदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार असून बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी,तसेच जनावरांच्या पिण्यासाठी करण्यात येणार आहे. मंगळवार च्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, मका, कडवळाच्या पिकांना जीवदान मिळाले असून पिके तरारण्यास सुरवात झाली आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती. अचानक आलेल्या पावसामुळे या परीसरातील शेतकऱ्यांचे एक पाणी वाचले आहे.

खोरोचीच्या बंधाऱ्याला ३८० नवीन ढापे...
आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे खोरोची येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला ३८० नवीन ढापे मिळाले असून बंधाऱ्याची गळती कमी झाल्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याचे दादासो भाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com