सायकल चोरींच्या वाढत्या प्रकारामुळे नागरिक हैराण

pune
pune

पुणे : ''शारीरिक तंदुरूस्तीबरोबरच पर्यावरण वाचवा-इंधन वाचवा'' असा संदेश देण्याच्या दृष्टीने, आयटीयन्समध्ये सायकलींचा वापर वाढत असतानाच हजारो रूपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सायकली चोरीला जाण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे, सायकल प्रेमी नागरिक विशेषतः आयटीयन्स पुरते हैराण झाले आहेत. 

हिंजवडी, तळवडे आयटी पार्क येथे काम करणाऱ्या लोकांची संख्या मोठी असून त्यातील बरेचसे आयटीयन्स हिंजवडी, निगडी प्राधिकरण, पिंपळे सौदागर, वाकड, आकुर्डी, रहाटणीमध्ये स्थायिक झाले आहेत.

मागील काही वर्षांपासून इन्फोसिस, कॉग्निझंट, पर्सिस्टंट, सिंटेल, विप्रो आदी आयटी कंपन्यांतील अनेक कर्मचारी दररोज व्यायामासाठी सायकलींचा वापर करत आहे. रोज घर ते ऑफिस साठी देखील सायकलींचा वापर करणाऱ्या कर्मचारींची संख्या ही वाढत आहे. असे असताना सायकल चोरी चे प्रकार ही वाढत आहेत. 

सायकल प्रेमी शैलेश भिडे म्हणाले,''८ महिन्यांपूर्वी मी फोकस नावाच्या कंपनीची विदेशी बनावटीची सायकल खरेदी केली होती. तसेच पूर्वीची फायरफॉक्स कंपनी ची १५ हजार रुपये किंमतीची सायकल चोरट्यांनी चोरून नेल्या. आवश्यक कागदपत्रांसह मी निगडी पोलिसांकडे तक्रार केली. परंतु, चोरटे अजून सापडले नाहीत. 

निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे म्हणाले, ४ महिन्यांपूर्वी सायकल चोरीच्या प्रकरणात अल्पवयीन मुले सापडून आली. त्यांच्या कडून सुमारे ८० सायकली जप्त केल्या. त्यातील काही सायकली त्यांच्या मालकांनी परत नेल्या आहेत. तर जवळपास ५५ सायकली आमच्याकडे पडून आहेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com