फुलांच्या विक्रीला पावसामुळे फटका 

फुलांच्या विक्रीला पावसामुळे फटका 

पुणे : मार्केट यार्ड येथील फूल बाजारात लक्ष्मी पूजनासाठी फुलांची चांगली आवक झाली. झेंडूची सुमारे 75 हजार किलो आवक झाली. पावसामुळे किरकोळ विक्रीला फटका बसला. 

दसऱ्यानंतर दिवाळीच्या हंगामात फुलांना चांगले भाव मिळतील अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सोमवार पाठोपाठ मंगळवारी (ता.6) मोठ्या प्रमाणावर झेंडू आणि शेवंतीची आवक झाली; परंतु अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. झेंडूला प्रतिकिलोला 10 ते 40, तर शेवंतीला 60 ते 100 रुपये भाव मिळाला. 

व्यापारी प्रकाश काळे म्हणाले, "दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळीत फुलांची आवक कमी होईल असा अंदाज होता. मात्र, दसरा आणि दिवाळीच्या नियोजनाने लागवड केलेल्या फुलांचे उत्पादन सुरू होते. दसऱ्यानंतर पाणी कमी पडेल आणि उत्पादन घटेल असा अंदाज होता. मात्र, शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून फुले टिकवली. काही शेतकऱ्यांनी चांगले भाव मिळतील या आशेने फुले रोखून धरली होती. आज मंगळवारी (ता.6) विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. पाणी कमी पडल्याने फुलांचा दर्जादेखील चांगला नव्हता, तर शेवटचा तोडा असल्याने शेतकऱ्यांनी सर्व प्रकारची फुले आणल्याने आवक वाढली होती.'' 

सोमवारपेक्षा मंगळवारी फुलांची बाजारात चांगली आवक झाली; परंतु पावसामुळे किरकोळ विक्रीवर परिणाम झाला. 
सागर भोसले, फुलांचे व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com