आंबेगावातील प्रशासनासह नागरिकांमध्ये या कारणामुळे धाकधूक... 

डी. के. वळसे पाटील 
शुक्रवार, 22 मे 2020

आंबेगाव तालुक्‍यातील शिनोली गावात शुक्रवारी (ता. 22) व दोन दिवसांपूर्वी साकोरे गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. हे दोघेही मुंबईहून आलेले आहेत.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील शिनोली गावात शुक्रवारी (ता. 22) व दोन दिवसांपूर्वी साकोरे गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. हे दोघेही मुंबईहून आलेले आहेत.

मुंबईहून आंबेगाव तालुक्‍यात आलेल्यांची संख्या आठ हजार आहे. त्यातील चार संशयितांचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेत प्रतीक्षेत आहे. अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी व तालुक्‍यातील ग्रामपंचायतीची धाकधूक वाढली आहे. 

कुरकुंभ येथील केमिकल साठ्याला आग

आंबेगाव तालुक्‍यात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून गेली पावणेदोन महिने प्रशासनाने व मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, निरगुडसर, पेठ, कळंब, रांजणी, पारगावतर्फे अवसरी बुद्रूक, लोणी या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसह सर्वच ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे प्रतिबंधक औषधांची फवारणी करून सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली होती. काही ग्रामपंचायतीने तर प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप केले, तसेच इन्फ्रारेड थर्मामीटरमार्फत व्यक्तींचे तापमानही मोजले होते. आरोग्य खात्याने कुटुंब सर्वेक्षण मोहीम राबविली. व्यापारी वर्गानेही चांगली साथ दिली. 

तुमचं गाव कन्टेन्मेंट झोनमध्ये तर नाही ना..

आंबेगाव तालुक्‍याला तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. पण, चौथा लॉकडाउन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांची वर्दळ तालुक्‍यात वाढली. त्याचा फटका येथील जनतेला बसला आहे. थेट मुंबई- पुण्याहून आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यासाठी गावोगावी प्रशासनाने शाळा ताब्यात घेतल्या आहेत. ग्रामपंचायतींनी त्यांना सर्व सुविधा पुरविल्या आहेत. काही जणांना स्वतःच्या घरातच होम क्वारंटाइन केले आहे. वारंवार घराबाहेर पडू नका, अशा सूचनाही त्यांना दिल्या जात आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पण, या सूचनांकडे दुर्लक्ष करून काहीजण सकाळ- संध्याकाळ गावात व परिसरात फिरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सरपंच व आशा सेविका यांनी संबंधितांना जाब विचारल्यास भांडणेही झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सरपंच व आशा सेविकाही हतबल झाले आहेत. एकंदरीत प्रशासनातील अधिकारी व ग्रामपंचायती सध्या चिंतेत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to this reason, there is panic among the citizens including the administration in Ambegaon