esakal | गंगातारामुळे उतारवयात आम्हाला मिळाला आधार | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

gangatara

गंगातारामुळे उतारवयात आम्हाला मिळाला आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : आमच्यासाठी आश्रम नाही, तर घरचं आहे. या वृद्धाश्रमातील मंडळींना कोणतीही उणीव भासत नाही. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर मायेच्या आधाराची गरज असते ती या आश्रमात मिळत आहे, असे वृद्धाश्रमातील शालिनी सहस्रबुद्दे यांनी सांगितले.

वडकी (ता. हवेली) येथील गंगातारा वृद्धाश्रमामध्ये मानवतावादी समाजसेवा संघटनचे आजीव सदस्य व लेखापाल श्रीनिवास नंबियार यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या. याप्रसंगी मानवतावादी समाजसेवा संघटनेचे अध्यक्ष गफ्फार खान, सचिव अशोक जाधव, कार्याध्यक्ष अरविंद पिल्ले, उपाध्यक्ष प्रकाश रावळकर, खजिनदार सईद शेख, कार्यकारी सदस्य मेहमूदशा भंडारी, सदस्य रजनी दाणी, बाळू गोरे, रोहिदास ऐकाड, बाळू बारवकर, गणेश जठार, सुनील पाटेकर, स्वामी, शीला बारवकर, अनिल बारवकर उपस्थित होते. यावेळी शीला बारवकर, सोनीका बारवकर,

संस्थेचे पारदर्शी कामे पाहून शीला बारवकर, अनिल बारवकर व पलंगे यांनी संस्थेचे आजीव सदस्यपद स्वीकारले.वृध्दाश्रमाच्या संस्थापिका अध्यक्षा नीता भोसले व संस्थापिका सचिव अॅड, लक्ष्मी माने स्वागत करून आभार मानले.

loading image
go to top