वेल्हे- अंत्रोली रस्त्यावर पावसाने भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

due to rain Velhe-Antroli road Pothole ST service closed possibility of accident pune

वेल्हे- अंत्रोली रस्त्यावर पावसाने भगदाड

वेल्हे,(पुणे) : वेल्हे तालुक्यामध्ये गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने असलेल्या वेल्हे -अंत्रोली रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून या परिसरातील जड वाहनांची वाहतूक बंद झाल्याने या मार्गावरील एसटी सेवा बंद झाली आहे. पडलेले भगदाड तात्काळ बुजवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गुंजवणी धरण क्षेत्र परिसरात पावसाचा जोर हा अधिक असून या परिसरातील अंत्रोली , निवि,घिसर , विहीर, धानेप या भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे.

कोसळणाऱ्या पावसामुळे वेल्हे ते अंत्रोली मार्गावरील अंत्रोली गावच्या अलीकडे रस्त्यास मोठे भगदाड पडले असून गावाकडे जाणारी एसटी सेवा बंद झाली असून नागरिकांची मोठे हाल होत आहेत .तर या मार्गावरून पानशेत भागाकडे जाण्यासाठी मोठी वर्दळ असते तर गुंजवणी धरण परिसर कादवे घाटामध्ये पर्यटकांची संख्या मोठी असती पडलेले भगदाड तात्काळ बुजवावे अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती कोदापुरचे माजी सरपंच भिमाजी देवगिरीकर व अंत्रोली येथील नागरिक अक्षय राऊत यांनी दिली.

पानशेत परिसरातील गावांना याच मार्गाने रेशनिंग चा पुरवठा करण्यात येतो याची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास येथील गावांना रेशनिंग पुरवठा करण्यास अडथळा निर्माण होणार असल्याची माहिती वेल्हे येथील रेशन पुरवठादार आनंद देशमाने यांनी दिली. दरम्यान पुणे जिल्हा बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य रेवणनाथ दारवटकर यांनी या खड्ड्याची पाहणी केली असून बांधकाम विभागास खड्डा बनविण्याची सूचना दिली आहे. याबाबत बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय संकपाळ म्हणाले ,'या खड्ड्याची पाहणी केली असून प्राथमिक स्वरूपात अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या असून पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या ठिकाणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.'

Web Title: Due To Rain Velhe Antroli Road Pothole St Service Closed Possibility Of Accident Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..